ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे रिओ ग्रांदे डो सुल येथे 233 दशलक्ष वर्षे जुन्या डायनासोरचे जीवाश्म सापडले. हे जीवाश्म अत्यंत पुरातन असल्याने त्याच्यामुळे डायनासोरच्या उत्क्रांतीवर प्रकाश पडू शकतो आणि शास्त्रज्ञांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला यश मिळू शकते. नव्या शोधामुळे शास्त्रज्ञांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
नव्याने सापडलेले जीवाश्म ‘हेरेरासॉरिड्स’ या फॅमिलीतील आहेत. हेरेरासॉरिड्स हे सर्वात जुने मांसाहारी डायनासोर आहेत. हा विशिष्ट नमुना 8 फूट लांबीचा आहे. फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ सांता मारियाचे जीवाश्मशास्त्रज्ञ रोड्रिगो टेम्प म्युलर यांच्या टीमने हा शोध लावला. जिथे जीवाश्म सापडले ती जागा 20 वर्षांपासून संशोधकांचे पेंद्रबिंदू आहे. हा प्रदेश ट्रायसिक जीवाश्मांच्या समृद्धीसाठी ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने जमिनीची धूप झाली आणि लाखो वर्षांपासून दफन झालेले जीवाश्म वर आले. सुरुवातीला शास्त्रज्ञांनी फक्त हाडे आहेत, असे वाटले. पण हळूहळू संपूर्ण सांगाडा समोर आला. डायनासोरच्या उत्क्रांतीवर प्रकाश टाकण्याची दृष्टी दिली.
शोध का महत्त्वाचा…
– आतापर्यंत सापडलेल्या सर्वात जुन्या डायनासोर जीवाश्मांपैकी एक. साधारण 232 दशलक्ष वर्षांपूर्वीचे जीवाश्म. म्हणजेच डायनासोरच्या उत्क्रांतीचे एक उदाहरण. जीवाश्मांचा अभ्यास करून डायनासोरची वैशिष्टय़े आणि वर्तन यावर प्रकाश टाकता येईल.
– सापडलेले जीवाश्म हेरेरासॉरिड्स डायनासोरचे आहेत. हे डायनासोर दोन पायांचे होते. शिकार पकडण्यासाठी धारदार पंजे असलेले दोन हात मोकळे होते. नव्या शोधामुळे शास्त्रज्ञांमध्ये उत्साह आला आहे.