भरतनाट्यममध्ये उज्ज्वल यश; इशान्वीचा शिवसेनेकडून गौरव

नृत्यकलेत विशेषतः भरतनाट्यमच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपली छाप सोडत उज्ज्वल कामगिरी करणाऱ्या मालाडच्या इशान्वी इनामदारचा आज शिवसेनेकडून गौरव करण्यात आला. शिवसेने नेते, आमदार सुनील प्रभू यांनी  इशान्वीच्या घरी जाऊन शाल, पुष्पगुच्छ, नटराजची मूर्ती व खाऊ देऊन तिचा सत्कार केला.

मालाड पूर्व शिवधाम कॉम्प्लेक्समधील त्रिमूर्ती सोसायटीत राहणाऱ्या इशान्वी इनामदारला नृत्य स्पर्धेत मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. तिचा शिवसेनेने गौरव केला. यावेळी शाखाप्रमुख सुभाष धानुका, युवा उपशाखा अधिकारी मंगेश चव्हाण, शिवसेनेचे माजी सचिव किरण वाडीवकर, इशान्वीची आई सोनाली, वडील संजय, आजी अलका जोशी, नृत्यसंस्थेच्या संस्थापिका प्रीती रे, सुब्रतो रे उपस्थित होते. गुरू राधिका कुलकर्णी व संध्या हरी यांच्या मार्गदर्शनाखाली इशान्वीने नृत्यकलेत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.