
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांवर विरोधकांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अर्थमंत्री राहेल रिव्हज या भर संसदेत रडल्या. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे देत होते. तेव्हा रिव्हज यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रिव्हज यांच्या रडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या प्रचंड ट्रोल झाल्या आहेत. अनेकांनी त्यांना कमकुवत मंत्री म्हटले आहे. अर्थमंत्र्यांच्या रडण्यामुळे ब्रिटनचे चलन पौंड डॉलरच्या तुलनेत 1 टक्क्याने घसरला आहे.
रिव्हज यांच्या रडण्यामुळे गुंतवणूकदारांना चान्सरलची खुर्ची धोक्यात असल्याचे जाणवले. त्यामुळे ऑक्टोबर 2022नंतर पौंड पहिल्यांदाच इतका घसरला. 2022मध्ये पंप्रधान लिझ ट्रस यांच्या मिनी बजेटमुळे बाजारात प्रचंड गोंधळ उडाला आणि ट्रस यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
रिव्हज यांच्यासाठी पंतप्रधान धावले
पंतप्रधान स्टार्मर हे रिव्हज यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. रिव्हज यांच्या अश्रूंचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आणि रिव्हज येत्या अनेक वर्षांपासून चान्सलर राहतील अशी खात्रीही त्यांनी दिली. दरम्यान, अर्थ मंत्र्यांच्या प्रवक्त्यांनी ही रिव्हज यांची वैयक्तिक बाब असल्याचे सांगितले. त्या वेळी लेबर खासदारांशी झालेल्या वादामुळे त्या भावनिक झाल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.