
येमेनच्या किनाऱ्याजवळील लाल समुद्रात काही अज्ञातांनी ब्रिटनच्या जहाजावर हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी गोळ्यांचा वर्षाव करत रॉकेटही डागले. या हल्ल्याला जहाजावरील सशस्त्र जवानांनी जशास तसे उत्तर दिले. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नसून चौकशी सुरू आहे.
इस्रालयने गाझापट्टीमध्ये केलेली घुसखोरी व हल्ल्याचा निषेध म्हणून येमेनमधील हुती बंडखोर लाल समुद्रातून जाणाऱ्या व्यापारी व लष्करी जहाजांना लक्ष्य करत आहेत. आतापर्यंत हुती बंडखोरांनी 100 हून अधिक व्यापारी जहाजांवर क्षेपणास्त्रे व ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यामुळे दोन जहाजे बुडाली असून चार जण मारले गेले आहेत.