इराण-इस्रायल संघर्षानंतर खामेनी पहिल्यांदाच जगासमोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि इस्रायलमधील संघर्षादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी बंकरमध्ये आश्रय घेतल्याचे बोलले जात होते. मात्र, आता खामेनी पहिल्यांदाच जगासमोर आले. शनिवारी ते तेहरानमधील एका कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी दिसले.

तेहरानच्या सरकारी टेलिव्हिजनने या कार्यक्रमाचे फुटेज प्रसारित केल्याचे एका वृत्तात म्हटले आहे. खामेनी काळ्या पोशाखात होते. त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. दोन्ही देशांमधील संघर्षादरम्यान वाढत्या सुरक्षेच्या चिंतेमुळे ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसून आले नव्हते. तसेच ते नेमके कुठे आहेत याचीही कोणाला कल्पना नव्हती. मात्र, ते आता पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसले आहेत.