शहीद जवान दीपक चिंगाखम यांचे वडील म्हणाले; मुलाचा अभिमान

सीमा सुरक्षा दलाचे जवान दीपक चिंगाखम यांना जम्मू कश्मीरच्या आर एस पुरा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारा चोख प्रत्युत्तर देताना वीरमरण आले. आपल्या मुलाचा आपल्याला अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया 25 वर्षीय शहीद दीपक चिंगाखम यांच्या वडिलांनी दिली आहे. दीपक चिंगाखम पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कित्येक तास सुरू असलेल्या उपचारांनंतरही त्यांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत. त्यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी इंफाळ विमानतळ येथे आणण्यात येणार आहे.