
भारत संचार निगम लिमिटेडने भारत फायबर सर्व्हिसअंतर्गत एंट्री लेवल ब्रॉडबँड प्लानवर स्पेशल सूट ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना तीन महिन्यांच्या मंथळी टॅरिफवर डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच पहिल्या महिन्यासाठी ग्राहकांना फ्री सर्व्हिस दिली जाणार आहे. म्हणजेच ग्राहकांना एकूण चार महिने या ऑफरचा फायदा मिळू शकेल. फायबर बेसिक, फायबर बेसिक निओ हे दोन प्लॅन उपलब्ध आहे.































































