बुद्धभूषण गोटे ‘दलित पँथर’चे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दलित समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱया ‘दलित पँथर’ या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बुद्धभूषण गोटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलित पँथरच्या पक्षश्रेष्ठाr मलिका नामदेव ढसाळ यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना मलिका ढसाळ यांनी ही नव्या संघर्षाची तयारी असल्याचे सांगतानाच दलित पँथरला आज पन्नास वर्षांहून जास्त काळ झाला तरीही पँथरचे गारुड जनमानसात कायम असल्याचे सांगितले. दलित पँथर हे एक हत्यार आहे आणि क्रांतीची ज्वाला आहे, असेही त्या म्हणाल्या. अंधेरी चारबंगला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी भवनात हा कार्यक्रम झाला. या वेळी दलित पँथरचे मुंबई, महाराष्ट्रातील पँथर, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.