Budget 2026 – दारू, बिडी, सिगारेट ते मोबाईल, कापड, चामडं… काय स्वस्त, काय महाग; जाणून घ्या एका क्लिकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी विक्रमी नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला असून त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे काही वस्तू स्वस्त होणार आहेत, तर काही महाग होणार आहेत. सर्वसामान्यांच्या दररोज उपयोगात येणाऱ्या कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या आणि कोणत्या महाग झाल्या हे जाणून घेऊया…

काय स्वस्त होणार

कपडे आणि कापड – टेक्सटाईल क्षेत्राला दिलासा मिळाल्याने कपडे स्वस्त होतील.

चामड्याच्या वस्तू – लेदर उत्पादने आणि सिंथेटिक फूटवेअरच्या किमती कमी होतील.

आरोग्य सेवा – कॅन्सर आणि मधुमेहाची 17 औषधे आता ड्युटी फ्री करण्यात आली आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स – मोबाईल बॅटरी आणि लिथियम आयन सेल स्वस्त होतील.

ऊर्जा – सोलर ग्लास (सौर काच) स्वस्त होणार आहेत.

इंधन – मिक्स्ड गॅस सीएनजी आणि विमानाचे इंधन (ATF) स्वस्त होईल.

तसेच इलेक्ट्रिक वाहने (EV), मायक्रोवेव्ह ओव्हन आणि परदेश प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आहे. यासह बिडीही स्वस्त होणार आहे.

Budget 2026 – एक घोषणा अन् शेअर बाजार भूईसपाट; जाणून घ्या शेअर बाजाराला दणका देणारी घोषणा

काय महाग होणार

दारू

भंगार (स्क्रॅप)

खनिजे

सिगारेट

ऑप्शन ट्रेडिंग

लक्झरी घड्याळे

खते

पान मसाला

गुटखा

कॉफी

आयात केलेली दूरदर्शन उपकरणे

कॅमेरे

चित्रपटासाठीची इतर उपकरणे

परदेशातून आयात केलेली छायाचित्रण, चित्रपट निर्मिती आणि ध्वनीमुद्रणाची उपकरणे