बुलढाणा येथील जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचा कोनशिला समारंभ आज (24 ऑगस्ट) पार पडला. या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात येत असताना देऊळगाव राजा न्यायालयाचे न्यायाधीश शैलेश उत्तमराव कंठे यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला.
कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय देखील बुलढाणा शहरात आले होते. या कार्यक्रमासाठी बुलढाणा येथे येत असताना देऊळगावराजा न्यायालयाचे न्यायाधीश शैलेश कंठे यांना देऊळगाव मही जवळ हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तत्काळ देऊळगाव मही येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना चिखली येथे पाठवले. मात्र चिखली येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.