शेगावीचा राणा संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूर वरून परतीच्या प्रवासाला असुन आज मेहकर शहरात हजारो भक्तांनी पालखीचे जल्लोषात स्वागत केले. शहरात पालखीचे आगमन होताच नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने उपमुख्याधिकारी रवींद्र वाघमोडे, कर अधिक्षक सुधीर सारोळकर, अधीक्षक अजय चैताने, अजय मापारी, आरोग्य निरिक्षक संजय गिरी, श्रीकांत महाजन, प्रियांका सुरवसे, प्रगती काळे, बुद्धू गवळी, संजय खोडके, प्रमोद पाटिल, विलास जौजाळ, संतोष मानवतकर व सहकार्यांनी श्रींच्या पालखीचे प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. टाळ, मृदुंगाच्या गजरात व श्रीच्या जय घोषणाने चिमुकल्या सह हजारो भाविकांनी श्रींच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखीचा मुक्काम शिवाजी हायस्कूल मध्ये असल्याने शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी शिवाजी हायस्कूल मध्ये दर्शनाचा लाभ घेतला.
शहरात खामगाव नाकापासून शहरातील ठीक ठिकाणी स्वागत कमानी गेट व प्रत्येक घरासमोर व रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढून श्रींच्या जय घोषणाने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. श्रींची पालखी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक समोरून शिवाजी उद्यान, पोलीस स्टेशन समोरील मुख्य रस्त्याने शिवाजी हायस्कूलमध्ये पोहोचली. वारकर्यांची भोजन व्यवस्था रवी अग्रवाल यांनी केली. वारकर्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्थेसाठी मे.ए.सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये करण्यात आली होते. ठाणेदार राजेश शिंगटे यांनी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान शहरातील अनेक दानशूर यांनी वारकर्यांना महाप्रसाद व भेटवस्तुंचे वाटप केले. शहर पत्रकार संघाच्या वतीने वारकर्यांना चहा, बिस्कीट वितरीत करण्यात आले. तर शिवचंद्र मित्र मंडळाच्या वतीने 1100 लाडू वाटण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक रामेश्वर भिसे, विनोद भिसे, विनोद डुरे यांचेसह मित्रमंडळ उपस्थित होते.
श्रींच्या पालखीचे शहरात महेश अर्बनचे अध्यक्ष गोपाल मोदाणी, महेश विद्या मंदिराचे अध्यक्ष डॉ. सुभाष लोहिया, डॉ. डी. एफ. माल, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, तालुका प्रमुख निंबाजी पांडव, शहर प्रमुख किशोर गाराळे, युवा सेना पदाधिकारी अॅड. आकाश घोडे, ऋषी जगताप, उपतालुका प्रमुख रमेश देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष पंकज हजारी, माजी उपसभापती बबनराव तुपे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे, महाराष्ट्र अर्बनचे संचालक गजानन देशमुख, भरत सारडा, जयचंद बाठीया व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जय भवानी नवदुर्गा उत्सव मंडळाचे सदस्यांसह हजारो भाविकांनी श्रीच्या पालखीचे दर्शन घेतले. शहरातील योगीराज सेवाधारी ग्रुपच्या वतीने पालखी सोबत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.