
सामना प्रतिनिधी । मालवण
आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण शहरात मंजूर झालेल्या ३ कोटी १२ लाख निधीच्या अद्ययावत सोयी सुविधा व सिनेमागृह असलेल्या जिल्ह्यातील पहिल्या बसस्थानक उभारणीचे भूमीपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी एसटी बाबत जे प्रकल्प हाती घेतले त्याला परिवहन मंत्र्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, अर्थराजमंत्री दीपक केसरकर यासह अन्य सर्वच मंत्र्यांची साथ आमदार नाईक यांना लाभल्याने मोठ्या प्रमाणात विकासनिधी मालवण-कुडाळ मतदारसंघात उपलब्ध झाला. जिल्ह्यातील पहिले सिनेमागृह असलेले अद्ययावत असे बसस्थानक येथे साकारले जात आहे. जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर दर्जेदार सुविधा मिळतील यासाठी आमदार नाईक, पालकमंत्री व आपला पाठपुरावा सतत सुरू असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, शिवसेना जिल्हापरिषद गटनेते नागेंद्र परब, व्यापारी संघ जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, शहर अध्यक्ष उमेश नेरूरकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळू अंधारी, भाऊ सामंत, युवासेना शहरप्रमुख तपस्वी मयेकर, आरोग्य सभापती पंकज सादये, बांधकाम सभापती गणेश कुशे, नगरसेवक नितीन वाळके, सेजल परब, तृती मयेकर, पूजा करलकर, सुनीता जाधव, आकांक्षा शिरपुटे, आप्पा लुडबे, यशवंत गावकर, बबलू राऊत, विकी तोरस्कर, नाना पारकर, अंजना सामंत, किसन मांजरेकर, किरण वाळके, संमेश परब, नंदू गवंडी, महेद्र म्हाडगुत, विनायक परब, बाबा आंगणे, समीर हडकर, स्वप्नील आचरेकर, मंगेश सावंत, रवी तळाशीलकर, अक्षय रेवंडकर, नंदा सारंग, परशुराम पाटकर, मधुरा चोपडेकर, विभाग नियंत्रक श्री. रसाळ, आगार व्यवस्थापक एन. व्ही. बोधे यांच्यासह अन्य पदाधिकारी, एसटीचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते. सूत्रसंचालन करून अभय खडपकर यांनी आभार मानले.
खासदार राऊत म्हणाले, एसटीच्या कारभार तोट्यात चालला असताना एसटीच्या माध्यमातून राज्यातील स्थानकांचे दर्जेदार पद्धतीने नूतनीकरण करणे त्याचबरोबर एसटीच्या सेवेत जास्तीत जास्त गाड्यांचा भरणा करण्यावर भर देण्यात आला आहे. हे करत असताना पत्रकार, अंध, अपंगांना चांगल्या सवलती देण्याचे काम परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले. स्थानकांच्या नूतनीकरणासाठी १०० कोटी रुपये शासनाने उपलब्ध करून दिले.
आमदार नाईक म्हणाले, अद्ययावत बसस्थानक निर्माण करण्याचे जे वचन दिले त्याची आज पूर्तता होत आहे. माझ्या मतदार संघातील कुडाळ, ओरोस, मालवण तीन बसस्थानके होती ती आता मार्गी लागली आहेत. एसटीची सुविधा ही सर्वसामान्य प्रवाशांना आधार आहे. त्यामुळे बसस्थानके सुसज्ज असली पाहिजेत यासाठी प्रयत्न केले त्याला यश मिळाले. नगराध्यक्ष, नगरसेवक, नागरिक व प्रवासी यांची सुसज्ज बसस्थानकाची मागणी होती. ती पूर्ण होत आहे. सद्यःस्थितीतील बसस्थानकाच्या मागील बाजूस इमारत बांधली जाईल. जिल्ह्यातील तिन्ही बसस्थानके झाल्यानंतर मतदार संघातील कट्टा, कसाल, आचरा असेल कुडाळ तालुक्यातील माणगाव ही छोटी स्थानकेही दर्जेदार बनविली जातील. जेणेकरून प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील.
जिल्ह्याला २० बसेस मिळणार
राज्याच्या अर्थसंकल्पात २०० एसटी बस देण्याचे सरकारने मान्य केले आहे. त्यातील २० बसेस पालकमंत्री केसरकर यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मिळणार आहेत. शहराचा विकास साधत असताना ज्या कामांची आपण मागणी करतो त्याचा पाठपुरावा करायला हवा. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी उर्वरित निधी उपलब्ध करून दिल्याने हे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. त्याचबरोबर नळपाणी योजनेचे कामही लवकर पूर्ण करावे असे नाईक यांनी स्पष्ट केले.
कोकणातील दुसरे बसस्थानक सिनेमागृह
कोकणातील रत्नागिरीनंतरचे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले बसस्थानक आहे. ज्यामध्ये सिनेमागृह बांधले जात आहे. एसटीच्या उत्पन्न वाढीचा यात विचार करण्यात आला आहे. एसटीच्या माध्यमातून शासन निधीतून हे सिनेमागृह असलेले बसस्थानक आता साकारले जात आहे.
































































