भायखळा स्टेशनजवळ ओव्हरहे़ड वायरमुळे ५ मोठे स्फोट

10

सामना ऑनलाईन, मुंबई

भायखळ स्टेशनचा परीसर रात्री साडेदहाच्या सुमाराच पाच मोठ्या स्फोटांनी हादरला. हे स्फोट ओव्हरहेड वायरमुळे काहीतरी अवजड वस्तू टाकल्याने झाल्याचं सांगण्यात येत आहे. भायखळ्याच्या प्रसिद्ध ‘एस’ ब्रिजजवळ हे स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.  या स्फोटांमुळे ३ नंबरची म्हणजेच सीएसएमटीहून कल्याणच्या दिशेेने जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली आहे.

या ओव्हरहेड वायरवर ब्रिजवरून अज्ञात व्यक्तीने काहीतरी वस्तू टाकली ज्यामुळे हे स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्रवाशांनी घाबरून जाऊ नये, दुरुस्ती पथक तत्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आल्याचं रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या