‘पोहे खाण्यावरून ओळखलं तो बांग्लादेशी आहे’ भाजप नेत्याचे विधान

1892

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशाच्या विविध भागात आंदोलने सुरू आहेत. याच मुद्दाबाबत बोलत असताना भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनी एक विधान केलंय, जे प्रचंड व्हायरल झालं आहे. पोहे खाण्यावरून मी एक मजूर हा बांग्लादेशी आहे हे ओळखलं होतं असा दावा केला आहे.

गुरुवारी इंदूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना विजयवर्गीय बोलले की ‘माझ्या घरी एका खोलीचं काम सुरू होतं. त्यासाठी जे मजूर आले होते त्यांची खाण्याची पद्धत पाहून मला थोडं विचित्र वाटलं. ते फक्त पोहे खात होते, मी त्यांच्या मुकादमाला विचारलं की हे बांग्लादेशी आहेत का ? यानंतर दिवसांनी ते सगळे मजूर कामावर आलेच नाहीत’ विजयवर्गीय यांनी सांगितले की त्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली नाहीये. ‘मी सगळ्यांना सतर्क करतोय कारण देशांतर्गत सुरक्षेला हा मोठा धोका आहे. मी बाहेर जातो तेव्हा माझ्यासोबत 6 सुरक्षारक्षक असतात, कारण घुसखोर देशातील वातावरण बिघडवत आहेत’ असं विजयवर्गीय म्हणाले.

CAA बाबत बोलताना विजयवर्गीय म्हणाले की अफवांवर लक्ष देऊ नका. हा कायदा देशाच्या हितासाठीचाच आहे. या कायद्यामुळे शरणार्थींना संरक्षण मिळेल आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोका असलेल्या घुसखोरांची ओळख पटू शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या