
केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना 28 डिसेंबरच्या रात्री साडेनऊ वाजता घडली. या घटनेत चालकासह सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाले आहेत.
28 डिसेंबर रोजी सकाळी प्रतापराव जाधव यांना नागपूर येथे विमानतळावर सोडून चालक भूषण चोपडे व सुरक्षा रक्षक पो.कॉ. वैभव देशमुख हे वाहनाने (एमएच 28-बी के 0077) मेहकरकडे येत असताना मालेगाव टोलनाक्यावर समोरून येणाऱया पीकअपचे टायर फुटल्याने दुसऱया वाहनावर धडकले. दरम्यान चालक भूषण चोपडे आणि सुरक्षा रक्षक वैभव देशमुख दोघे किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी मालेगाव पोलिसांनी मदतकार्य केले.



























































