साहित्य अकादमी पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार 2025 साठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 31 मे पर्यंत आहे. साहित्य अकादमी यांनी अनुवादकांना, त्यांच्या हितचिंतकांना आणि प्रकाशकांना साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कारासाठी 24 हिंदुस्थानी भाषांमध्ये अनुवादित पुस्तके सादर करण्याचे आमंत्रण दिले आहे. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान प्रथमच प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा पुरस्कारासाठी विचार केला जाईल.