कॉफी शॉपच्या लेडिज टॉयलेटमध्ये कॅमेरा, पोलिसांनी विकृत कर्मचाऱ्याला केली अटक

प्रातिनिधिक फोटो

कॉफी शॉपच्या महिला शौचालयात कॅमेरा सुरू ठेवून मोबाईल लपवून ठेवण्यात आला होता. जेव्हा एका तरुणीला हा मोबाईल दिसला तेव्हा तिने आरडा ओरड केली. कॉफी शॉपच्याच एका विकृत कर्मचाऱ्याचा हा कारनामा होता. पोलिसांनी या प्रकरणी या कर्मचाऱ्याला अटक केली आहे.

बंगरुळूमध्ये बीईएल मार्गावर थर्ड वेव्ह कॉफी शॉप आहे. या दुकानात एक तरुणी कॉफी प्यायला गेली होती. फ्रेश होण्यासाठी जेव्हा ती टॉयलेटमध्य गेली तेव्हा कचऱ्याच्या डब्यात तिला एक वस्तू सापडली. ही वस्तू पाहून ती तरुणी हादरलीच. कचऱ्याच्या डब्यात कुणीतरी मोबाईल ठेवला होता. या मोबाईलचा कॅमेरा सुरू होता. आणि कमोडच्या दिशेने तो कॅमेरा होता. हा मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवला होता जेणेकरून कुठल्याही नोटिफिकेशन मोबाईलवर येणार नाही आणि त्याचा आवाज होणार नाही. तरी या तरुणीच्या नजरेत हा मोबाईल पडला आणि तिने मॅनेजमेटकडडे याची तक्रार केली. तेव्हा हा मोबाईल कॉफी शॉपमध्येच काम करणाऱ्या 23 वर्षी मनोज या कर्मचाऱ्याचा असल्याचे कळाले. या प्रकरणी पोलिसांनी ओरोपी मनोजला अटक केली आहे.