
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतल्या आझाद मदैनात आंदोलन केले होते. सरकारने ही मागणी मान्य करत तसा शासन निर्णय जारी करू असे म्हटले आहे. पण तेलंगाणात ओबीसींना 42 टक्के आरक्षण आहे, तसे राज्य सरकार करणार का असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठ्यांना आरक्षण देण्यास महाराष्ट्र शासन अनुकूल झाले. पण आज तेलंगाणा शासनाने जातीनिहाय जनगणना करून तिथल्या सर्व मागासवर्गीय जातींना सुमारे 42 टक्के आरक्षण दिले. महाराष्ट्र शासन तेलंगाणा शासनाचा आदर्श घेईल का? असे सपकाळ म्हणाले.
हैदराबाद गॅझेटमधील तरतुदी ग्राह्य मानून मराठ्यांना आरक्षण देण्यास महाराष्ट्र शासन अनुकूल झाले. पण आज तेलंगाणा शासनाने जातीनिहाय जनगणना करून तिथल्या सर्व मागासवर्गीय जातींना सुमारे ४२% आरक्षण दिले. महाराष्ट्र शासन तेलंगाणा शासनाचा आदर्श घेईल का?
– श्री. हर्षवर्धन सपकाळ… pic.twitter.com/BUD0Ak3Qb5
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 3, 2025