32 टक्के आरक्षणातील सर्व प्रवर्ग रद्द करा; मनोज जरांगे पाटील यांची मागणी

मराठा आणि ओबीसी मिळून 60 टक्के लोकसंख्या आहे. 32 टक्के आरक्षणातच सरकारने वेगवेगळे प्रवर्ग केले आहेत. हे सर्व प्रवर्ग रद्द करून ओबीसींसाठी हे संपूर्ण आरक्षण खुले केले पाहिजे अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंडल आयोगाने मराठा समाज मागास सिद्ध केल्याचे सांगितले. मात्र मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे ते 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून देण्यात आले आहे. मर्यादा ओलांडून देण्यात आलेले आरक्षण टिकत नाही, हेच आम्ही वारंवार ओरडून सांगत आहोत. ओबीसीतून आरक्षण हा मराठय़ांचा हक्कच आहे. आम्ही वेगळे काही मागत नसल्याचेही ते म्हणाले.