
मुंबईच्या कोस्टल रोडवर अपघाताची बातमी समोर आली आहे. कोस्टल रोडवरील बोगद्यात एका धावत्या कारला अचानक आग लागली. त्यामुळे संपूर्ण बोगद्यात धुराचे लोण पसरले आणि काही क्षणातच संपूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील कोस्टल रोडच्या बोगद्यात एका कारला अचानक आग लागल्याने ती जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे बोगद्यात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. pic.twitter.com/QqWsnOhp4f
— Saamana Online (@SaamanaOnline) July 15, 2026
आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या घटनेत कोणालाही दुखापत झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने मदतकार्य सुरू केले. या घटनेमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून जवळपास 3 किमी पर्यंत वाहनांच्या लाबंच लाब रांगा लागल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.




























































