Video-भांडुपमध्ये कारला भीषण आग, सतर्क नागरिकांनी वाचवले चालकाचे प्राण

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई उपनगरातील भांडुप येथे एका कारला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. भांडुप पश्चिमेला लाल बहाद्दूर शास्त्री मार्गावरील मंगतराम पेट्रोलपंपाच्या समोर या कारने अचानक पेट घेतला. सुदैवाने त्यावेळी सतर्क नागरिकांनी कारचालकाला तत्काळ बाहेर काढण्याने मोठी दुर्घटना टळली.

भांडुप पश्चिमेच्या मंगतराम पेट्रोल पंपासमोर कारला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या