
मोठय़ा कॉर्पोरेट पंपनीत नोकरी करायची तर विशेष प्रावीण्य घेत उच्च शिक्षण पूर्ण करावे लागते. याशिवाय तुमचा शिक्षणाचा ट्रक रेकॉर्डदेखील दमदार असावा लागतो. मात्र, एका मराठमोळ्या मुलीला कोणतीही पदवी पूर्ण केलेली नसतानादेखील बीएमडब्ल्यूमध्ये मोठय़ा पगाराची नोकरी मिळाली आहे. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. गौरी मोरे असे या तरुणीचे नाव आहे. 19 वर्षे वयाच्या गौरीने कोणतेही उच्च शिक्षण घेतलेले नाही. पण, तिची डिजिटल क्रिएटर हीच ओळख बीएमडब्ल्यूला भावली. पंपनीने तिला मार्पेटिंग विभागात नोकरी दिली आहे. गौरीचे लिंक्डइनवर 65 हजारांपेक्षा आणि इन्स्टाग्रामवर 35 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर मजबूत पकड आणि डिजिटल ब्रांड म्हणून तिची ओळख हीच सर्वात मोठी पात्रता ठरली.
























































