पुन्हा अल्कराजच, पाच तास 29 मिनीटांच्या संघर्षानंतर राखले जेतेपद

यानिक सिनरला चक्क तीनदा जेतेपदापासून दूर करण्याची करामात करणाऱ्या स्पेनच्या कार्लेस अल्कराजनेच लालमातीतला नवा बादशाह आपणच असल्याचे दाखवताना प्रेंच ओपनचे जेतेपद राखले. प्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ ठरलेली ही अंतिम लढत तब्बल 5 तास 29 मिनीटे चालली. या पाच सेटच्या संघर्षात अल्कराजने 4-6, 6-7 (4-7) असे पिछाडीवर असतानाही पुढील दोन सेट 6-4, 7-6 (7-3) अशी बाजी मारत सामना पाचक्या सेटपर्यंत ताणला. पाचक्या सेटमध्ये अल्कराजने 4-2 अशी आघाडी घेत आपले कर्चस्क राखण्याचा प्रयत्न केला, पण सिनरने पुन्हा जोरदार खेळ करत त्याला बरोबरीत गाठले. अखेर 6-6 अशा बरोबरीनंतर सामना ट्रायब्रेकरमध्ये खेळला गेला. यात अल्कराजने कमाल दाखवत तो गेम 10-2 (7-6) असा जिंकत आपले सलग दुसरे प्रेंच जेतेपद पटकावले. हे त्याचे पाचवे ग्रॅण्डस्लॅम ठरले.