पावशी, वेताळबांबर्डे, पणदूर येथे सर्व्हिस रोडवर कार्पेट करण्याचे आदेश: वैभव नाईक यांनी वेधले लक्ष

सामना प्रतिनिधी । कुडाळ

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणात कुडाळ तालुक्यातील पावशी, वेताळ बांबर्डे, पणदूर येथे करण्यात आलेल्या सर्व्हिस रोडवर खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. याबाबत कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आज गुरूवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम चंद्रकांत पाटील यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून या रस्त्यावर कार्पेट करण्याची मागणी केली. त्यावर पाटील यांनी महामार्ग अधिक्षक अभियंता देशपांडे यांच्याशी संपर्क साधून पावशी, वेताळ बांबर्डे, पणदूर येथे दुरावस्था झालेल्या सर्व्हिस रोडवर कार्पेट करण्याचे आदेश दिले आहेत. येणाऱ्या चार दिवसात पावसाची उघडीप मिळाल्यानंतर हे काम केले जाणार आहे, अशी माहिती आमदार वैभव दिली आहे.

सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना पर्यायी मार्गासाठी सर्व्हिस रोड उभारण्यात आले आहेत. मात्र पावसामुळे या रस्त्यावर खड्डे पडून रस्त्याची दुरावस्था झाली आहे. वाहनचालक व नागरिकांना याचा त्रास होत असल्याने आमदार वैभव नाईक यांनी फोन वरून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून हि बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत लवकरात लवकर या रस्त्यांवर डांबरीकरण करण्याचे आदेश देण्याची मागणी केली. या मागणीची श्री. पाटील यांनी तातडीने दखल घेऊन महामार्ग अधिक्षक अभियंता श्री. देशपांडे यांच्याशी संपर्क साधून पावशी,वेताळ बांबर्डे,पणदूर येथे सर्व्हिस रॉडवर कार्पेट करून हे मार्ग सुस्थितीत करण्याचे आदेश दिले आहेत. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या