दाभोलकर हत्याप्रकरण; पुढील आठवड्यात आरोपपत्र दाखल करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सीबीआयची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी बुधवारी कोर्टाला सांगितले की, दाभोलकर यांना गोळय़ा घालणारे आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्या विरोधात 13 फेब्रुवारीपर्यंत पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, तर पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीचीच स्पेशल इन्वेस्टिगेशन टीम अटक करण्यात आलेल्या आणखी तिघा आरोपींविरोधात 12 फेब्रुवारीपर्यंत चार्जशिट दाखल करणार आहे.

न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीत सीबीआय व सीआयडीने सीलबंद तपास अहवाल कोर्टाला सादर केला.