कुडाळ CBSE result : 10वी च्या परीक्षेत बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूलचा 100 टक्के निकाल

364

कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळचा सीबीएसई या 10वी च्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून यामध्ये या स्कुलचा 100 टक्के निकाल लागला. यामध्ये समिप प्रफुल्लकुमार शिंदे याने 91.4% मिळवून पहिला नंबर मिळवला. पद्मन प्रशांत वजराटकर याने 91.2% मिळवत दुसरा क्रमांक मिळवला तर तिसरा क्रमांक आदित्य संजय कांबळे याने 87% गुण मिळवत पटकावला आहे.

यावर्षी या परीक्षेसाठी एकूण 16 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी प्रथम श्रेणी मध्ये सात, द्वितीय श्रेणी मध्ये सहा, तृतीय श्रेणी मध्ये तीन विदयार्थी उत्तीर्ण झाले. 2019-20 या शैक्षणिक वर्षात पहिल्या बॅचचा निकाल 100 टक्के लागला होता. बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची ही यावर्षाची 10वी ची दुसरी बॅच आहे. त्या बॅचने ही यशाची परंपरा कायम राखली आहे. सिंधुदुर्गातील होतकरू, बुद्धीमान, गरजू विदयार्थ्यांना या जिल्हयात उपलब्ध नसलेले राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणित केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचे शिक्षण मिळावे व त्यातून संस्कारक्षम आणि सामाजिक व नैतिक मूल्ये जोपासणारी पिढी तयार व्हावी या संकल्पनेतून बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलचा प्रवास सुरू झाला. आज या प्रशालेच्या दुसऱ्या 10वी च्या बॅचने 100 टकाके निकाल देऊन शाळेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या