
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीला लागावी यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, तिसरी ते बारावीपर्यंत राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांना शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
सीबीएसईची पाठय़पुस्तके इंग्रजी व हिंदी माध्यमात उपलब्ध आहेत, ती मराठीसह अन्य भाषेत उपलब्ध करून दिली जातील. शाळांचे वार्षिक वेळापत्रक 15 जूनपासून सुरू होते, पण नवीन शैक्षणिक वर्ष सीबीएसईच्या वेळापत्रकानुसार 1 एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्याचा विचार आहे, असे भुसे यांनी नमूद केले आहे.