
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच रेल्वे प्रशासनाने आता ट्रेनच्या प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. गर्दीत वाद होणे, महिला प्रवाशांच्या बाबतीत गैरप्रकार घडणे अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वेने हे नवीन पाऊल उचलले आहे. सध्या प्रायोगिक स्वरूपात काही डब्यांत सीसीटीव्ही बसवले जाणार असून त्याचा सकारात्मक परिमाण सर्व डब्यांत टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये आणि 15000 इंजिनमध्ये सीसीटीव्ही बसवण्यास मंजुरी दिली आहे. प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ दोन कॅमेरे असतील तसेच प्रत्येक डब्यामध्ये 4 डोम प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. एक पुढील बाजूस, एक मागच्या बाजूस आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी एक अशा प्रकारे प्रत्येक इंजिनमध्ये 6 सीसीटीव्ही असतील.