निवडणूक आयोगाची कारवाई; 334 राजकीय पक्षांची नोंदणी केली रद्द

केंद्रीय निवडणूक आयोगाने 334 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. 2019 पासून सहा वर्षे एकही निवडणूक या पक्षांनी लढवलेली नाही. तसेच या पक्षांचे कार्यालयेही सापडत नाहीत. त्यामुळे ही कारवाई केल्याचे आयोगाने म्हटले आहे. दरम्यान, आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. देशात सध्या 2854 नोंदणीकृत अपरिचित राजकीय पक्ष आहेत. यापैकी अनेक पक्षांनी निवडणूक आयोगाच्या अटींचे पालन केलेले नाही. सहा वर्षांत एकही निवडणूक लढवलेली नाही आणि त्यांचा कार्यालयाचे पत्तेही बोगस आहेत. त्यामुळे आयोगाने आज 334 पक्ष नोंदणी यादीतून काढून टाकले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने यापूर्वी मे 2022 मध्ये 87, जून 2022 मध्ये 111 आणि सप्टेंबर 2022 मध्ये 253 पक्षांची नोंदणी रद्द केली होती.