सरकारचे गिफ्ट ,केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ

दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर देण्यात आली आहे. महागाई भत्त्यात (डीए) 5 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता डीए 17 टक्के झाला असून, 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. सरकारच्या तिजोरीवर प्रतिवर्षी 16 हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या डीए आणि पेन्शनधारकांच्या डीआरमध्ये 5 टक्के वाढीला आज मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

काय आहे निर्णय?

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याची पहिलीच वेळ. यापूर्वी 2 ते 3 टक्के वाढ होत होती.
  • डीए आणि डीआरमधील 5 टक्के वाढीमुळे प्रतिवर्षी सुमारे 16 हजार कोटींचा अतिरिक्त बोजा सरकारी तिजोरीवर पडणार आहे.
  • जुलै 2019 पासून वाढीव महागाई भत्त्याची अंमलबजावणी होईल. त्यानुसार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळेल.
आपली प्रतिक्रिया द्या