केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये बदल केले आहेत. या नवीन वेळापत्रकामध्ये अनेक भरती परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरी सेवा पूर्व परीक्षा 25 मे 2025 रोजी होणार आहे. 22 जानेवारी रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 फेब्रुवारी असेल. तसेच अभियांत्रिकी सेवा (प्राथमिक) परीक्षा 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 18 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर 2024 असेल. संयुक्त भू-शास्त्रज्ञ (प्राथमिक) परीक्षा 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. 4 सप्टेंबर 2024 रोजी अधिसूचना जारी होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2024 असेल. संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. 11 डिसेंबर 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 असेल. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि नौदल अकादमी (एनए) परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे.