रक्षाबंधनाआधी भाऊराया लोकल प्रवासात खोळंबले; मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामुळे मनस्ताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या लोकल सेवेचे वेळापत्रक शुक्रवारी, रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येलाही पूर्णपणे विस्कळीत झाले होते. ‘अप’ आणि ‘डाऊन’ अशा दोन्ही दिशांनी जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. सकाळपासून दुपारपर्यंत गाड्यांचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे, बहिणीच्या घरी वेळेत पोहोचण्यासाठी धडपडणारे भाऊराया बराच वेळ लोकल प्रवासातच अडकून पडले. रेल्वेच्या या अनास्थेमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.