मध्य रेल्वेने रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार 5 ऑक्टोबरपासून 20 गाड्या (10 अप आणि 10 डाऊन) या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून न सुटता दादरमधून सुटणार आहे. CSMT स्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीच्या वेळी अनेक गाड्या या व्हेटींगमध्ये उभ्या असतात. दररोज 254 फास्ट ट्रेन्स या CSMT वरून सुटतात आणि पुन्हा सीएसएमटी ला येतात. मात्र प्लॅटफॉर्मच्या कमतरतेमुळे गाड्या वेळेत पोहचत नाहीत. त्यामुळे सीएसएमटी वरुन सुटणाऱ्या 20 जलद गाड्यांचे एकप्रकारे शिफ्टींग दादर स्थानकावर करण्यात आले आहे. त्यामुळे इतर गाड्यांच्या वेळापत्रकात सुद्धा बदल होणार आहे. हा बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे सीएसएमटीवर होणार गर्दी कमी करणे हा आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.