पावसाळ्यात नेरळ-अमन लॉज दरम्यानची सेवा बंद राहणार; माथेरान-अमन लॉज शटल सेवा सुरू राहणार

पर्यटकांचे आकर्षण असलेली माथेरानची राणीची लोकप्रियचा वाढली आहे. ही मिनी ट्रेन आता नेरळ- अमन लॉजदरम्यान पावसाळ्याच्या काळात बंद राहणार आहे. या ट्रेनमधून सफर करण्यासाठी पर्यटक येतात. त्यामुळे या ट्रेनची लोकप्रियता वाढली आहे. मध्य रेल्वे 8 जून 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 या कालावधीत पावसाळ्यात नेरळ-माथेरान नॅरो गेज मार्गावरील नेरळ-अमन लॉज विभागादरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, माथेरान-अमन लॉज दरम्यानची शटल सेवा नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे.

माथेरान-अमन लॉज शटल सेवा

(अ) माथेरान-अमन लॉज शटल सेवा (दैनंदिन)
१. 52154 माथेरान येथून ०८.२० वाजता सुटेल अमन लॉज येथे ०८.३८ वाजता पोहचेल
२. 52156 माथेरान येथून ०९.१० वाजता सुटेल अमन लॉज येथे ०९.२८ वाजता पोहचेल
३. 52158 माथेरान येथून ११.३५ वाजता सुटेल अमन लॉज येथे ११.५३ वाजता पोहचेल
४. 52160 माथेरान येथून १४.०० वाजता सुटेल अमन लॉज येथे १४.१८ वाजता पोहचेल
५. 52162 माथेरान येथून १५.१५ वाजता सुटेल अमन लॉज येथे १५.३३ वाजता पोहचेल
६. 52164 माथेरान येथून १७.२० वाजता सुटेल अमन लॉज येथे १७.३८ वाजता पोहचेल

(शनिवार/रविवारी)

७. विशेष-२ माथेरान येथून १०.०५ वाजता सुटेल अमन लॉज येथे १०.२३ वाजता पोहचेल
८. विशेष-४ माथेरान येथून १३.१० वाजता सुटेल अमन लॉज येथे १३.२८ वाजता पोहचेल

(ब) अमन लॉज-माथेरान शटल सेवा (दैनंदिन)
१. 52153 अमन लॉज येथून ०८.४५ वाजता सुटेल माथेरान येथे ०९.०३ वाजता पोहचेल
२. 52155 अमन लॉज येथून ०९.३५ वाजता सुटेल माथेरान येथे ०९.५३ वाजता पोहचेल
३. 52157 अमन लॉज येथून १२.०० वाजता सुटेल माथेरान येथे १२.१८ वाजता पोहचेल
४. 52159 अमन लॉज येथून १४.२५ वाजता सुटेल माथेरान येथे १४.४३ वाजता पोहचेल
५. 52161 अमन लॉज येथून १५.४० वाजता सुटेल माथेरान येथे १५.५८ वाजता पोहचेल
६. 52163 अमन लॉज येथून १७.४५ वाजता सुटेल माथेरान येथे १८.०३ वाजता पोहचेल

(शनिवार/रविवारी)

७. विशेष-१ अमन लॉज उपविभाग. १०.३० वाजता सुटेल माथेरान येथे १०.४८ वाजता पोहचेल
८. विशेष-३ अमन लॉज उपविभाग. १३.३५ वाजता सुटेल माथेरान येथे १३.५३ वाजता पोहचेल

सर्व शटल सेवा ३ द्वितीय श्रेणी, एक प्रथम श्रेणी डब्बा आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील. प्रवाशांनी कृपया या बदलांची नोंद घ्यावी आणि शटल सेवा सुविधेचा लाभ घ्यावा, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.