
देशातील कामगार संघटनांसंदर्भात सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी आणि असंविधानिक आहे, अशा शब्दांत ‘सीटू’ संघटनेने शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी मांडलेल्या तर्काला कुठलाही सैद्धांतिक आधार वा अनुभवजन्य वैधता नाही, असे नमूद करीत ‘सीटू’ संघटनेने सरन्यायाधीशांना त्यांच्या विधानाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
कामगार संघटनांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी देशातील औद्योगिक वाढ थांबवण्यासाठी कामगार संघटनांचे नेते मोठय़ा प्रमाणात जबाबदार आहेत, असे मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले होते. त्यावर ‘सीटू’ संघटनेने शुक्रवारी तीव्र चिंता व्यक्त केली.






























































