स्टेट बँकेच्या नूतन अध्यक्षपदासाठी चल्ला शेट्टींच्या नावाची शिफारस

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन पदासाठी मॅनेजिंग डायरेक्टर चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. बँकेचे सध्याचे अध्यक्ष दिनेश खारा यांच्या जागी शेट्टी यांची निवड होण्याची माहिती समोर आली आहे.

शेट्टी यांची जानेवारी 2020 मध्ये मॅनेजिंग डायरेक्टर पदावर नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते इंटरनॅशनल बँकिंग, ग्लोबल मार्पेट आणि तंत्रज्ञान विभागाचा कार्यभार सांभाळत आहेत. विद्यमान चेअरमन दिनेश खारा यांचे वय 63 होत असल्याने ते निवृत्त होत आहेत. त्यामुळे परंपरेनुसार मॅनेजिंग डायरेक्टर असलेले शेट्टी यांची स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एसबीआयकडून पॅबिनेट अपॉइंटमेंट कमिटीला शेट्टी यांच्या नावाची शिफारस होईल. त्यांच्याकडून शेट्टींच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब होईल.