लग्न मंडपात धाड टाकून सहा सिलिंडर केले जप्त, घरगुती सिलिंडरचा अवैध वापर करणाऱ्या कॅटरर्स मालकावर गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर करून जेवण बनविणाऱ्या कॅटरर्स व्यावसायिकावर पुरवठा विभागाच्या भरारी पथकाने लग्न मंडपातच धाड टाकून सहा घरगुती सिलिंडर जप्त केल्याची धक्कादायक घटना घडली असून कॅटरर्स व्यावसायिक विनोद लखन चौधरी (४२) यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर शहरातील दाताळा रोडवरील रामसेतू पुलाजवळील साईराम ग्रीन फार्म मंगल कार्यालयावर धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.