चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक वादातून एका 17 वर्षीय मुलाचा खून करण्यात आला. या चाकू हल्ल्यात मुलाचे चार नातेवाईक गंभीर जखमी झाले आहे. रस्त्यात दुचाकी ठेवण्यावरून दोन कुटुंबात वाद झाला होता. त्यामुळे यातील एका कुटुंबाने चंद्रपूरवरून दोन गुंड बोलावले. या गुंडांनी रात्रीच्या वेळेत कामडी कुटुंबावर चाकू हल्ला केला.
चाकू हल्ल्यात 17 वर्षांचा प्रेम कामडी हा मुलगा ठार झाला. तर इतर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चंद्रपूरतील एका रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मूल पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले. राजेश खणके, सचिन खणके, वैभव महागावकर, नरेंद्र कामडे, मनीषा कामडे कपिल गेडाम, श्रीकांत खणके, अशी त्या सहा आरोपींची नावे आहेत. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आज मूल बंदचे आवाहन करण्यात आले आहे.