चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या गांगलवाडी गावातील शेतशिवारात वाघीण मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही वाघीण शेतात मृत अवस्थेत आढळली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या बचाव पथकाला याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वाघिणीचे सर्व अवयव असून दीड वर्षाची आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.