Chandrapur जिल्ह्यात आढळला दुर्मिळ डुमरेल ब्लॅक हेडेड स्नेक

dumeril-black-headed-snake

 

चंद्रपूर जिल्ह्यात क्वचित दिसणारा ‘डुमरेल ब्लॅक हेडेड स्नेक’ गोंडपिपरी तालुक्यात आढळून आला आहे. ग्रामीण भागात या सापाला काळतोंड्या म्हटले जाते. हा साप बिनविषारी असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक बंडू धोतरे यांनी दिली.

गोंडपिपरी तालुक्याला घनदाट जंगलाने वेढले आहे. प्रस्तावित कन्हारगाव अभयारण्यात या वनक्षेत्राचा काही भाग गेला आहे. येथे अनेक दुर्मिळ वन्यजीवांच्या अधिवास आहे. हा दुर्मिळ साप कॅमेरात कैद झाला.