मर्सिडीजमधून फिरणाऱ्या आणि लेआऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही, बावनकुळेंची घोषणा

शेतकऱयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाईल. मात्र, मर्सिडीज घेऊन फिरणारे, ले-आऊट आणि फार्म हाऊसवाल्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. अमरावती येथे एका कार्यक्रमात राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, आमच्या शेतकऱयांना शब्द दिला होता की, पुढील 5 वर्षे शेतातील विजेचा बिल येणार नाही. तसेच, खऱयाखुऱया गरजू शेतकऱयांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत, असे ते म्हणाले.