‘ओपनएआय’ची हिंदुस्थानात एण्ट्री

चॅटजीपीटी बनवणारी कंपनी ओपनएआयने हिंदुस्थानात जोरदार एण्ट्री मारली आहे. कंपनीने पहिले ऑफिस दिल्लीत उघडले असून या कार्यालयात काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा सुरू केली आहे. सध्या ओपनएआयकडे केवळ एकच कर्मचारी आहे. परंतु आता नव्या कार्यालयासोबत नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. ओपनएआय हिंदुस्थानात आपले पाय रोवण्याची तयारी करत आहे. त्यासाठीच कंपनीने नवीन ऑफिस उघडले असून लोकल टीमचा विस्तार करण्याचे ठरवले आहे.