हिंदुस्थानात चॅटजीपीटी बंद होणार, टॅरिफनंतर अमेरिकेचे एआय वॉर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी हिंदुस्थानवर पुन्हा निशाणा साधला आहे. त्यांनी या वेळी आर्टिफिशियल इंटलिजेन्स आणि चॅटजीपीटी तंत्रज्ञानावर टीका केली आहे. त्यांच्या मते, एआय आणि चॅटजीपीटीवर हिंदुस्थानात बंदी घातली पाहिजे. त्यांच्या या विधानामुळे कोट्यवधी युजर्समध्ये चिंतेचे वातावरण आहे. पीटर नवारो यांच्या मते, एआय आणि चॅटजीपीटी ही अमेरिकेत विकसित झालेली सेवा आहे. अमेरिकेच्या गुंतवणूकदारांनी यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. परंतु याचा सर्वाधिक वापर हा हिंदुस्थान व चीनमध्ये केला जातो. चॅटजीपीटीच्या वापरामुळे अमेरिकेवर आर्थिक भार वाढत आहे.