
काही वर्षांपूर्वी हिंदुस्थानातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा वसवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला फळ येताना दिसत आहे. कारण आता हिंदुस्थानात चित्त्यांचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी नामिबियातून आलेल्या ज्वाला नावाच्या मादी चित्त्याने पाच गोंडस शावकांना जन्म दिला होता. ज्वाला ही कुनोमधील यशस्वी मादी चित्ता ठरली आहे. ज्वालाने आतापर्यंत तीनदा पिल्लांना जन्म दिलेला आहे. कुनोमधील वातावरण आणि परिसंस्था चित्त्यांना चांगलीच मानवत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
























































