
बाल शोषण ही एक गंभीर समस्या असून देशात याचे प्रकार वाढले आहेत. बाल शोषण मुलाच्या शारीरिक, भावनिक आणि मानसिक आरोग्यावर विनाशकारी परिणाम करू शकते, त्यामुळे पालकांनी वेळीच याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा महत्त्वाचा सल्ला ‘स्नेहा’ या सामाजिक संस्थेशी जोडलेल्या डॉ. नैरीन दारूवाला यांनी दिलाय. बाल शोषण अनेक प्रकारचे आहे. यात मुलाला जाणूनबुजून दुखापत करणे, लैंगिक स्पर्श, मुलाने काही गोष्टी सांगितल्यास त्यावर पालकांनी विश्वास ठेवणे, त्यांचे म्हणणे ऐपून घेणे गरजेचे आहे.