
सध्या आधारकार्ड खूप महत्त्वाचे आहे. देशात आता जवळपास प्रत्येक नागरिकाकडे त्याचे आधारकार्ड आहे. सरकारी योजना, शाळेचा दाखला, बँकिंगपासून ते मोबाईल सिम खरेदीपर्यंत सर्व कामे ही आधारकार्डमार्फत करण्यात येतात. देशात लहान मुलांसाठी ब्लू आधारकार्डची सुविधा आहे. आता ब्लू आधारकार्ड तयार करण्यासाठी केंद्रावर जाण्याची गरज नाही. लहान मुलांचे ब्लू आधारकार्ड तयार करण्यासाठी यूआयडीएआयेच अधिकारी घरी येतील.