
चीनमध्ये एका माजी महापौराच्या घरात 13.5 टन शुद्ध सोने आणि 23 टन वजनी रोख रक्कम सापडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. झांग की असे या व्यक्तीचे नाव असून ते हैको शहराचे माजी महापौर होते. एवढा मोठा भ्रष्टाचार उघडकीस आल्याने या महापौराला थेट मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तपास यंत्रणांनी त्यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर हे सर्व घबाड उघडकीस आले. त्यांच्या घरातील एका गुप्त बेसमेंटमधून मोठय़ा प्रमाणावर सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. छाप्यादरम्यान, 13.5 टन सोन्याच्या विटा, 23 टन रोख रक्कम यामध्ये विविध देशांची चलने व नोटा, चीन आणि परदेशात आलिशान मालमत्ता असलेली कागदपत्रे, महागडे हॉटेल्स, व्हिला आणि लक्झरी कार जप्त करण्यात आल्या. चीनच्या न्यायालयाने झांक की यांना भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर आणि सरकारी निधीमध्ये अफरातफर केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवत शिक्षा सुनावली. हा गुन्हा समाजासाठी अत्यंत गंभीर असून यासाठी कोणतीही माफी दिली जाऊ शकत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.
























































