दिवसाला 6 अब्ज डॉलर खर्च, तरीही चीनची लोकसंख्या वाढेना

कुटुंबनियोजनसारख्या योजना राबवल्याने चीनसमोर नवे संकट उभे ठाकले आहे. लोकसंख्यावाढीसाठी चीन सरकार दिवसाला 6 अब्ज खर्च करत आहे. मात्र तरीही 2025 या वर्षात चीनची लोकसंख्या 34 लाखांनी कमी झाली आहे. सध्या चीनची लोकसंख्या 1.4 अब्ज एवढी आहे. लोकसंख्येत हिंदुस्थानच्या खालोखाल चीनचा नंबर आहे. चीनच्या सरकारने लोकसंख्या वाढवण्यासाठी 180 अरब युआन म्हणजे 2300 अब्ज रुपयांची  घोषणा केली. म्हणजे दिवसाला 6 अब्ज डॉलर खर्च केले जात आहेत. मुलांना जन्म द्यावा म्हणून चिनी नागरिकांना सबसिडी दिली जाते. तसेच मुलांना तिसरीपर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा आहे.

2025 मध्ये चीनची लोकसंख्या सलग चौथ्या वर्षी घटली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जन्मदर विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला असून मृत्यूदर वाढला आहे. वेगाने वृद्धांची संख्या आणि घटत्या विवाहांमुळे येत्या काळात ही घट आणखी वाढू शकते, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

2025 मध्ये एपूण जन्मांची संख्या 7.92 दशलक्ष झाली, जी 2024 मध्ये 9.54 दशलक्ष जन्मांपेक्षा सुमारे 17 टक्के कमी आहे. याव्यतिरिक्त, चीनचा जन्मदर दर 1000 लोकांमागे 5.63 पर्यंत घसरला, जो आतापर्यंतचा सर्वात कमी स्तर आहे. हा आकडा चीनच्या इतिहासात अत्यंत चिंताजनक मानला जातो.

चीनमधील तरुणाईचा कल लोकसंख्या न वाढण्याकडे दिसून येतोय. याशिवाय अविवाहित जीवन आणि घटस्पह्टांचे प्रमाण वाढले आहे.