
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने 1 मे ते 4 मे दरम्यान खेळविण्यात येणाऱ्या चिंतामणी चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ शिवसेना सचिव आणि लालबागचा राजा मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री सद्गुरु भालचंद्र महाराज क्रिडांगण (लाल मैदान ) येथे झाला. यावेळी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास पै उपस्थित होते. चिंतामणी क्रिकेट स्पर्धेत एकूण 28 संघांनी सहभाग घेतला आहे. विजेत्या संघास रोख रुपये व मानाचा चिंतामणी चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत संपूर्ण स्पर्धेत जेवढे डॉट बॉल झाले असतील तेवढे फूड्स बॉक्सचे वाटप केईएम, टाटा आणि वाडीया हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे डॉट बॉलच्या दहाच्या पटीत बीजगोळे (सीड बॉल) पावसाळ्यात डोंगराळ भागात जाऊन टाकून वनराई नैसर्गिकरित्या वाढविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. या उपक्रमासाठी वाशी येथील प्रश्न फाऊंडेशनचे सहकार्य लाभणार असल्याची माहिती मंडळाचे मानद सचिव वासुदेव सावंत यांनी दिली. ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता उप मानदसचिव प्रविण राणे, राजेश गावडे, महेश पेडणेकर, दिपक पेडणेकर, राजेश सावंत विशेष मेहनत घेत आहेत