सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धा, नवख्या रुब्लेव्हकडून फेडररला पराभवाचा धक्का

248

टेनिसकोर्टवर शुक्रवारी धक्कादायक निकाल लागला. जागतिक रँकिंगमध्ये 70 व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या 21 वर्षीय आंद्रे रूब्लेव्हने सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जिंकणाऱया दिग्गज रॉजर फेडररला अवघ्या एका तासात पराभूत केले. रॉजर फेडरर व आंद्रे रुब्लेव्ह हे पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एटीपी सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेतील पुरुषांचा एकेरीतील या सामन्यात रॉजर फेडररने तमाम टेनिसप्रेमींची निराशा केली. मात्र युवा खेळाडूने जबरदस्त खेळाने उपस्थित क्रीडाप्रेमींची वाहवा मिळवली.

आंद्रे रुब्लेव्ह व रॉजर फेडरर यांच्यामध्ये तिसऱया फेरीची लढत झाली. यावेळी आंद्रे रुब्लेव्ह याने रॉजर फेडररवर 6-3, 6-4 अशा फरकाने सहज विजय मिळवला. रॉजर फेडररने ही स्पर्धा सात वेळा जिंकण्याचा पराक्रम केला आहे. यंदा मात्र त्याला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. या स्पर्धेत रॉजर फेडररने आतापर्यंत 47 सामने जिंकले असून दहा वेळा त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या